वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा गुरुवारपासून १०० टक्के बहाल करण्यात येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Train: 100% local trains on Central, Western Railway, effective from Thursday
२८ ऑक्टोबर २०२१ पासून १०० टक्के उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर १,७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १,३६७ सेवा चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि लसीचे दोन घेतलेल्यांना, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद केली होती. त्यानंतर १५ जून २०२० पासून रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयानेअत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू केल्या होत्या.
गर्दीमुळे फेऱ्या वाढविल्या
१५ ऑगस्ट २०२१ पासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांत वाढ केली. सध्या ९५ टक्के फेऱ्या सुरु होत्या. सध्या मध्य रेल्वेच्या १,७०२ तर पश्चिम रेल्वेच्या १,३०४ फेऱ्या सुरू होत्या.
Mumbai Local Train: 100% local trains on Central, Western Railway, effective from Thursday
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच