• Download App
    मुंबई बनतेय जगाची कोकेन राजधानी|Mumbai is becoming the world's cocaine capital

    मुंबई बनतेय जगाची कोकेन राजधानी

    अमेरिकेकडून दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोसारख्या देशांवर अंमली पदार्थ विरोधात दबाव वाढायला लागल्याने आता मुंबई कोकेनची नवी राजधानी बनू पाहत आहे. जगाला कोकेन पुरविणारे शहर म्हणून मुंबईची ओळख बनू पाहत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.Mumbai is becoming the world’s cocaine capital


    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : अमेरिकेकडून दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोसारख्या देशांवर अंमली पदार्थ विरोधात दबाव वाढायला लागल्याने आता मुंबई कोकेनची नवी राजधानी बनू पाहत आहे. जगाला कोकेन पुरविणारे शहर म्हणून मुंबईची ओळख बनू पाहत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    अमेरिकेकडून दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांतील ड्रग माफियांवर कारवाया सुरू आहेत. या देशांवरही दबाव वाढत आहे.त्यामुळे कोकेनचा व्यापार आता भारताकडे सरकला आहे. येथूनच जगाच्या विविध भागात कोकेन पाठविले जाऊ लागले आहे.



    मुंबईच नव्हे तर देशातील इतर शहरांभोवतीही ड्रग माफियांचा विळखा घट्ट होत असल्याचे निरिक्षण अंमली पदार्थ विरोधी पथकाने (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) नोंदिवले आहे. श्रीलंका, पोर्ट एलिझाबेथ आणि पनामा याठिकाणी गेल्या दोन वर्षांत २४९९ किलो कोकेन पडकले होते.आंतरराष्ट्रीय बाजारात कोकेनची किंमत पाच कोटी रुपये किलो आहे.

    कोकेनच्या निर्मितीसाठी पोटॅशिअम परमॅँगनेट लागले. भारतामध्ये त्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील ड्रग व्यवसाय आता भारतात आणि त्यातही मुंबईत हातपाय पसरू लागल्याची भीती आहे.

    एनसीबीच्या एका उच्चपदस्थ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये तीनशे किलो कोकेन आले होते. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडापर्यंत त्याच्या लिंक होत्या.

    Mumbai is becoming the world’s cocaine capital

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा