• Download App
    महेश मांजरेकर यांना अभय; उच्च न्यायालयाकडून अटकेसारखी कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश । Mumbai High Court grants relief to Mahesh Manjrekar, Accused of filming pornographic scenes on minors

    महेश मांजरेकर यांना अभय; उच्च न्यायालयाकडून अटकेसारखी कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांवर तीन आठवड्यांपर्यंत अटकेसारखी कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश शहर पोलिसांना दिले आहेत. Mumbai High Court grants relief to Mahesh Manjrekar, Accused of filming pornographic scenes on minors

    ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटामुळे ते अडचणीत आले आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलांवर अश्लील दृश्ये चित्रित केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांविरुद्ध तीन आठवड्यांसाठी अटकेसारखी कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना दिले.



    शहर पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मांजरेकर आणि इतरांविरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक मांजरेकर आणि निर्माते नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षणही मागितले.

    Mumbai High Court grants relief to Mahesh Manjrekar, Accused of filming pornographic scenes on minors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही