• Download App
    हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण, धुळीने श्वास कोंडला; नीचांकी कमाल तापमानाची नोंद । Mumbai has recorded the lowest maximum temperature in the last 10 years

    हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण, धुळीने श्वास कोंडला; नीचांकी कमाल तापमानाची नोंद

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. धुळीच्या वादळाने त्यांचा श्वास कोंडला आहे. दुसरीकडे दहा वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद झाल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. Mumbai has recorded the lowest maximum temperature in the last 10 years

    धूळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे रविवारी मुंबईचे कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले असून, गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली. दरम्यान, धुळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.



    गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व कोकण, गोव्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली. विदर्भात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

    Mumbai has recorded the lowest maximum temperature in the last 10 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!