• Download App
    Mumbai मुंबईची झाली तुंबई! रेड अलर्ट जारी,

    Mumbai : मुंबईची झाली तुंबई! रेड अलर्ट जारी, बस, लोकल आणि विमान सेवांवर परिणाम

    Mumbai

    मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांवर परिणाम झाला, ज्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mumbai पावसाळा सुरू झाला असून मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री उशिरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर दिसून येतो. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.Mumbai

    मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांवर परिणाम झाला, ज्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, कल्याणकडे जाणाऱ्या स्लो लोकल गाड्या ५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे जाणाऱ्या जलद लोकल गाड्या सरासरी १० मिनिटे उशिराने धावत होत्या. स्लो लोकल सेवा देखील सामान्य लोकलपेक्षा ५ मिनिटे उशिराने धावत आहेत.



    सकाळी ९ ते १० या वेळेत फक्त एका तासात सर्वाधिक पाऊस नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात पडला, जिथे १०४ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय, ए वॉर्ड ऑफिस येथे ८६ मिमी, कुलाबा पंपिंग स्टेशन येथे ८३ मिमी आणि महापालिका मुख्यालयात ८० मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा अग्निशमन केंद्रात ७७ मिमी, ग्रँट रोड आय हॉस्पिटलमध्ये ६७ मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्रात ६५ मिमी, मलबार हिलमध्ये ६३ मिमी आणि डी वॉर्डमध्ये ६१ मिमी पावसाची नोंद झाली.

    Mumbai has become Tumbai Red alert issued bus local and flight services affected

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray Group : ठाकरे गटाच्या आंदोलनावरून भाजपची टीका- उद्धव ठाकरे–संजय राऊतांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा, मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

    Sharad Pawar : आरक्षण वादावर शरद पवारांची भूमिका- कोणतीही कमिटी एका जातीची नको समाजाची करा, सामाजिक ऐक्य हवे

    Jitendra Awhad : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली भूमिका