विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यातला मुंबईतल्या प्रवेशाचा टोल माफीचा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा ठरला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट खुलासा केला ही टोल माफी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर कायमची आहे, असे ते म्हणाले. Mumbai entry toll waiver is not only for elections
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
- मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.
- आगरी समाजासाठी महामंडळ
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट
- ‘उमेद’साठी अभ्यासगट
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
Mumbai entry toll waiver is not only for elections
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय
- Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश
- Eknath shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!
- Reserve Bank of India : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक