• Download App
    मुंबईतील रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमांत बदल; BMC ने काढले आदेश ; वाचा नियमावली... MUMBAI COVID RULES

    MUMBAI COVID RULES : मुंबईतील रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमांत बदल; BMC ने काढले आदेश ; वाचा नियमावली…

    मुंबई महापालिकेची नवी नियमावली काय?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यातच आता कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहेत .काय आहेत हे नवीन नियम वाचा सविस्तर …MUMBAI COVID RULES

    इमारतीतील 20 टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास प्रशासनाकडून संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे.

    एखाद्या इमारतीमध्ये वा संकुलात किंवा गृहनिर्माण संस्थेत तितकी घरं आहेत, त्यापैकी 20 टक्के घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण असतील, तर ती इमारत सील केली जाणार आहे.

    अशा इमारतीतील रुग्ण व त्यांच्या संपर्कातील रहिवाशांसाठीही नियम घालून देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांनी गृह विलगीकरणाचे नियम कटाक्षाने पाळावेत.

    मुंबईतील सील बिल्डिंगची संख्या देखील 318 वर पोहोचली आहे. तर 4000 हून अधिक मजले सील करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बिल्डिंग सील करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

    MUMBAI COVID RULES

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!