• Download App
    मुंबई महापालिकचे आता स्पुटनिक लशीच्या थेट खरेदीसाठी जोरदार प्रयत्न सुरु।Mumbai corporation will trying to buy sputanic vaccine directly

    मुंबई महापालिकचे आता स्पुटनिक लशीच्या थेट खरेदीसाठी जोरदार प्रयत्न सुरु

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रशियाने तयार केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधक लशीची थेट खरेदी करण्यासाठी मुंबई पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी रशियन राजदूतांसह या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या रशियन कंपनीसोबत संपर्क साधला जात आहे. Mumbai corporation will trying to buy sputanic vaccine directly

    पालिकेने रशियन राजदुतांसह थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या ‘रशियन डायरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंड’ या कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भारतात स्पुटनिक लशीच्या मात्रेची किंमत पाहाता यासाठी ५०० कोटी रुपयांपर्यंत खर्चाची तयारी पालिकेने केली आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येते.



    पालिकेने कोविड लस खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. लशींच्या पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी पालिकेला प्रतिसाद दिला आहे. मात्र, या कंपन्या लसनिर्मिती करत नाहीत. त्या केवळ पुरवठादार आहेत. त्यामुळे पालिकेने जादाची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना कंपन्यांना केल्या आहेत.

    Mumbai corporation will trying to buy sputanic vaccine directly

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BIS Hallmarking : आता 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवरही BIS हॉलमार्क अनिवार्य; स्वस्त सोने खरेदी करणे होईल सुलभ

    RSS Chief : सरसंघचालक म्हणाले- देश सक्षमीकरणाने वाढेल; महिलांना मागास परंपरांपासून मुक्त केले पाहिजे

    विधिमंडळात मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी, सभागृहात जंगली रम्मी; सगळीकडेच “पवार संस्कारितांची” हुल्लडबाजी!!