पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
विशेष प्रतिनिधी
पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून सटट्टालावण्यासाठी वापरण्यात येणारे १० मोबाईल, रोख रक्कम असा एकुण ६७ हजार रुपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर परिसरातील वडकी येथे करण्यात आली.Mumbai and lakhnow IPL match satta ,four accused arrested by Pune police
परेश मोहन भूत (वय ३७, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ पुणे), प्रफुल नरेंद्र कलावटे (वय ३७, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ, पुणे), अषय पांडुरंग ठोंबरे (वय २६, शिवराधा नगरी, वडकी नाला, पुणे), महेश राजेंद्र शिरसागर (वय २३, शिवराधा नगरी, वडकी नाला, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकाळभोर परिसरात आयपीएल मॅचवर सटट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. यावेळी वरील चौघे हे मुंबई-लखनऊ आयपीएल सामन्यांवर मोबाईलच्या साह्याने सटट्टा लावतांना आढळले. पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १० मोबाईल, मार्कर पेन आणि नोंदवही जप्त करण्यात आले आहे.
सटट्टा घेण्याकरीता आरोपिंनी बनाटव कागदपत्रांच्या साह्याने सीम कार्ड खरेदी केले होते.सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सटट्टेबाज हे सक्रीय झाले आहेत. त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी कारवाई आदेश देण्यात आहे. त्यानुसार गुन्हेशाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ही कारवाई केली.
Mumbai and lakhnow IPL match satta ,four accused arrested by Pune police
महत्त्वाच्या बातम्या
- राणा दाम्पत्याच्या घरासमोरील आंदोलनकर्त्या १६ शिवसैनिकांना जामीन मंजूर
- ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करणार, पण दिवाळीनंतर आणि नेतृत्व पडळकरांचे!!
- दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी
- पित्याकडून आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार