विशेष प्रतिनिधी
मुंबई : MSRTC सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आता आदिवासी पाडा तिथे एसटी’ असा ठाम निर्धार करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.MSRTC
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार, सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी च्या चाकांनी मोजले जाणार आहे. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. ‘आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,’ असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरु केल्याची घोषणा केली.MSRTC
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मिडी बसेस विकासाची नवी वाट
राज्य परिवहन महामंडळ 9 मीटर लांबीच्या, 35 आसनी अशा 100 अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत.
स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल 93 टक्के लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार आहे.
पायवाटांवरून चाकवाटांकडे..
ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.
विकासाचा नवा संकल्प
‘लालपरी ‘च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संर्धीची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
MSRTC New Mission: ST Bus Service to Reach Every Tribal Pada in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये SIR, प्रत्येक जागेवर सरासरी 19000 नावे हटवली; TMCने म्हटले- सव्वा कोटी बंगाली रांगेत उभे
- शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!
- Asha Sharma : भारतीय वंशाच्या आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO बनल्या; फिल स्पेन्सर यांची जागा घेतील
- ED : ED ने 9 महिन्यांत ₹32000 कोटींची मालमत्ता जप्त केली; हे गृह मंत्रालयाच्या एका वर्षाच्या बजेटएवढे