• Download App
    Minister Pratap Sarnaik MSRTC Mandates Daily Alcohol Tests for Drivers & Conductors VIDEOS मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

    Minister Pratap Sarnaik : मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

    Minister Pratap Sarnaik

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Minister Pratap Sarnaik महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.Minister Pratap Sarnaik

    योग्य नोंदी घेतल्याशिवाय कुणालाही कर्तव्यावर पाठवू नये, निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिले. नव्या उपाययोजनांनुसार आगारात हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांमार्फत नियमित तपासणी होणार आहे.Minister Pratap Sarnaik



    ग्राउंडवर जाऊन केली होती पाहणी

    २५ जानेवारी रोजी सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली होती. चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाईचे निर्देश दिले होते.

    गोपनीय तपासणी होणार

    मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुक नोंद करणे अनिवार्य राहील. त्यानंतर पुन्हा अल्कोटेस्ट करूनच पुढील प्रवासास परवानगी दिली जाईल. बसस्थानक, आगार परिसर व विश्रांतीगृहांमध्ये वेळोवेळी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. दक्षता विभागाकडून गोपनीय तपासणीही केली जाणार आहे.

    मंत्र्यांची दांडी; नीलम गोऱ्हेंनी ‘अर्धा तास चर्चा’च केली रद्द !

    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी विधान परिषदेत सरकारची मोठी नामुष्की पाहायला मिळाली. ४२ मंत्र्यांपैकी एकही मंत्री सभागृहात फिरकला नसल्याने संतप्त झालेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अखेर महत्त्वाची ‘अर्धा तास चर्चा’ रद्द करीत सभा तहकूब केली. सकाळी १० वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा ‘अर्धा तास चर्चे’चे आयोजन करण्यात आले होते.

    उपसभापतींचा निर्णय

    दोन वेळा निर्देश देऊन आणि वेळ देऊनही मंत्री न आल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक भूमिका घेतली. महत्त्वाच्या चर्चेसाठी मंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित असते, मात्र गांभीर्य नसल्याने ही चर्चा पुढे नेता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी अर्धा तास चर्चाच रद्द करून टाकली. या प्रकारामुळे सत्ताधारी पक्षाच्या शिस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियमित कामकाज दुपारी १२ वाजता सुरू केले.

    Minister Pratap Sarnaik MSRTC Mandates Daily Alcohol Tests for Drivers & Conductors VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने म्हटले- कुठेही नमाज पठण करणे धार्मिक अधिकार नाही; सुरक्षा सर्वात आधी

    Iran war effect : पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा स्थगित; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

    Shinde : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी, ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल