वृत्तसंस्था
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar
कडाळे हे गुरुवारी ( ता.२३ ) नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. गुरुवारी रात्री कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला. ते सकाळी दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात कडाळे यांंचा मृतदेह पाठवला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.
MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar
महत्त्वाच्या बातम्या
- माणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय; अमित शाह यांचा निर्धार
- योगी यांच्या युपीमध्ये आदित्य ठाकरे करणार शिवसेनेच्या ३९ उमेदवारांचा प्रचार
- युक्रेनला गेलेले एअर इंडियाचे AI1947 विमान अर्ध्या वाटेवरूनच दिल्लीला माघारी, नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी गेले होते
- Russia – Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले- मृत्यू आणि विनाशाला केवळ रशियाच जबाबदार असेल, चोख प्रत्युत्तराचा इशारा
- रशिया-युक्रेनमधील युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम, शेअर बाजार कोसळले, सोने महागले – चांदी 66,000 पार
- रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे पुतीन यांना आवाहन – आपल्या सैनिकांना हल्ले करण्यापासून रोखा!