विशेष प्रतिनिधी
मुंबई – देशातील वीज क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या व अभियंत्यांच्या संघटनांनी येत्या मंगळवारी (ता. १०) देशव्यापी संपावर जाण्याची हाक दिली आहे. देशातील १५ लाख कर्मचारी, अभियंते व अधिकारी ‘सुधारित विद्युत कायदा- २०२१’च्या विरोधात संपावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील २६ संघटना सहभागी होणार आहेत.MSEB and other workers will go on strike
हा कायदा खासगीकरणासाठी पोषक असून तो सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. कृष्णा भोयर यांनी केले आहे.
यासंदर्भात कामगार संघटना केंद्र शासनाशी बोलणी करीत असून कोणत्याही परिस्थितीत हा ठराव पास करू देणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांनी पाठिंबा द्यावा व खासगीकरण रोखावे, असे आवाहन विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केले आहे.
MSEB and other workers will go on strike
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागल्याने अमेरिका पुरती हादरली, कमी लसीकरणाचा फटका
- इको- टुरिझमच्या बळावर ओडिशा टाकतोय कात, पर्यटकांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ
- इन्स्टाग्रामवरील मैत्री महिलेला चांगलीच भोवली, लंडनच्या मित्राने घातला लाखोंचा गंडा
- झारखंडमधील तरुण न्यायाधीशांचा मृत्यूला सरकारचा जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाकडून सुरक्षेबाबत चिंता
- ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!