अमर पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता.तेव्हापासून तो नैराश्यात होता, असं त्याच्या काही मित्रांनी सांगितले.MPSC student commits suicide by poisoning in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात स्वप्निल लोणकर नंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.अमर मोहिते (वय ३३) अस या विद्यार्थ्याचे नाव आहे.
या विद्यार्थ्याने पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी विषप्राशन करत आत्महत्या केली.
अमर पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता.तेव्हापासून तो नैराश्यात होता,असं त्याच्या काही मित्रांनी सांगितले.अमर मोहिते हा मुळचा सांगली जिल्ह्यातील होता.दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुणे शहरात आला होता.
सदाशिव पेठेतील एका वसतीगृहात तो राहात होता.दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पीएसआयच्या फिजिकल परीक्षेतून तो बाहेर पडल्याने नैराश्यात होता.तसेच कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे तर तो आणखी नैराश्यात गेला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली आहे.
MPSC student commits suicide by poisoning in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
- एकनाथ शिंदे – जितेंद्र आव्हाडांसमोरच शिवसेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक – कार्यकर्ते एकमेकांना भिडले!!
- कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा
- ALIBAG : रायगड पोलीस दलातदेखील कोरोनाचा स्फोट , ६० जणांना लागण