विशेष प्रतिनिधी
सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, आपल्या दहा वर्षाच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले. शैक्षणिक व्यवस्थेपासून ते रोजगारापर्यंत कोणतेही भरीव कार्य ते करू शकले नाहीत, त्यांचा पराभव अटळ आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली.MP Vinayak Raut’s defeat is inevitable, Mumbai BJP President Ashish Shelar’s criticism
आशिष शेलार शनिवारी एकदिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. पदाधिकारी संवाद व गटांच्या बैठका घेतल्यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शेलार पुढे म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेली फूट ही त्यांच्या नेतृत्वाच्या स्वार्थ व अहंकारातून पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मते आमच्यासोबत मागितली व मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. तो शब्द न पाळता स्वार्थी हेतून स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यातूनच त्यांचा पक्ष फुटला. तर दुसरीकडे स्वतःच्या मुलीला पक्षाचे नेतृत्व देण्यातून राष्ट्रवादीची शकले झाली. यात भाजपचा काय दोष असा सवाल करतानाच मी म्हणेन तेच खरे व मी घेईन तोच निर्णय योग्य अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात अहंकारी नेते आहेत, असा आरोप शेलार यांनी केला.
MP Vinayak Raut’s defeat is inevitable, Mumbai BJP President Ashish Shelar’s criticism
महत्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्यावर विजयवाडा येथे हल्ला; रोड-शो दरम्यान दगडफेक; कपाळाला मार
- माढात 2004 चा जुना प्रयोगच 2024 मध्ये करण्याची पवारांवर वेळ; नव्या दमाच्या चेहऱ्यांचा राष्ट्रवादीत बसेना मेळ!!
- ‘हेल्थ ड्रिंक्स’ श्रेणीतून बोर्नव्हिटा हटवा : केंद्राचा आदेश
- कंगना रणौतने काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा, म्हणाल्या…