• Download App
    कसले लॉकडाऊन... यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन... काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय...; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात उदयनराजेंचे लॉकडाऊनविरोधात भीक मागो आंदोलन | MP udayan raje bhonsle on bhik mango agitation in satara

    कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात उदयनराजेंचे लॉकडाऊनविरोधात भीक मागो आंदोलन

    विशेष प्रतिनिधी

    साताऱा – कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात भर दुपारी आज हे घडले. MP udayan raje bhonsle on bhik mango agitation in satara

    महाराष्ट्रात परत लॉकडाऊन केले जाईल, ही शंका व्यक्त होताच उदयनराजे यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. महाराष्ट्रात लॉक़ाऊन केले, तर जनतेमध्ये प्रचंड रोष उत्पन्न होईल. उद्योगधंदे, रोजगारावर त्याचा दुष्परिणाम होईल, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज हातात कटोरा घेऊन रस्त्यावर पथारी टाकून भीक मागो आंदोलन केले.



    उदयनराजे भोसले हे झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसले आणि भीक मागो आंदोलन केले. लॉकडाऊनबाबतचा रोष त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला. राज्यातील ठाकरे – पवार सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीकास्त्र सोडले.

    उदयन राजे म्हणाले, की महाराष्ट्रात काय बाजार मांडलाय काय या बाजारबुणग्यांनी… इथे ढिगाने पैसे खाताहेत आणि लसीकरण करता येत नाही त्यांना. लसीकरण झालेले कोरोना पॉझिटिव्ह होताहेत. शास्त्रज्ञांनी त्यावर बोलावे. या राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही. इच्छाशक्ती असेल, तरच सगळे काही होते. कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन करताहेत हे… काय यांच्या बापाची इस्टेट आहे, होय…, अशा कडक शब्दांमध्ये उदयनराजे यांनी ठाकरे – पवार सरकारचा समाचार घेतला.

    MP udayan raje bhonsle on bhik mango agitation in satara

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस