Monday, 5 May 2025
  • Download App
    पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह आढळला। Mother and son is brutally murdered in Pune; The body of a child was found in Katraj and the body of a mother was found in Saswad

    पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह आढळला

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात मायलेकराची हत्या करून त्यांचा मृतदेह दोन ठिकाणी फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच दिवशी मायलेकराचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. Mother and son is brutally murdered in Pune; The body of a child was found in Katraj and the body of a mother was found in Saswad

    दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. हत्या झालेल्या दिवसापासून मृत महिलेचा पती गायब आहे. मंगळवारी सायंकाळी नवीन कात्रज बोगद्याजवळ सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. मुलाची गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर काही तासांतच सासवड येथे त्याच्या आईचा मृतदेह आढळला आहे गळ्यावर वार करून तिची हत्या केली आहे. आयान शेख (वय-६ ) आणि आलिया आबिद शेख (वय-३५) असं हत्या झालेल्या मायलेकरांची नावं आहेत.


    पुणेकर आजपासून घेणार मोकळा श्वास; सर्व दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहणार


    मंगळवारी नवीन कात्रजच्या बोगद्याजवळ सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची गळा आवळून हत्या केल्याची निष्पन्न झालं होतं. दरम्यान मुलाचे नातेवाईक मुलाचा शोध घेत असल्यानं मुलाची त्वरित ओळख पटली. त्यानंतर काही तासांतच पुरंदर तालुक्यातील खळद याठिकाणी आईचाही मृतदेह सापडला आहे. याचा तपास सासवड पोलिस करत आहेत.

    पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आलिया यांचे पती आबिद शेख पुण्यातील एका कंपनीत ब्रॅंच मॅनेजर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते झूम कार घेऊन सहलीसाठी गेले होते. पण अद्याप त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे घातपात झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

    Mother and son is brutally murdered in Pune; The body of a child was found in Katraj and the body of a mother was found in Saswad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’