• Download App
    मुंबई, पुणे आणि भंडाऱ्यात सर्वाधिक लसीकरण; ७५ लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ । Most vaccinations in Mumbai, Pune and Bhandara; 75 lakh citizens are not comming to take for second dose of vaccine

    मुंबई, पुणे आणि भंडाऱ्यात सर्वाधिक लसीकरण; ७५ लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई, पुणे आणि भंडाऱ्यात सर्वाधिक लोकांचे कोरोना लसीकरण झाले असून ७५ लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. ७५ लाख नागरिक दुसऱ्या डोसची नियोजित वेळ उलटून गेली तरी लस घेण्यासाठी ते आलेले नाहीत. Most vaccinations in Mumbai, Pune and Bhandara; 75 lakh citizens are not comming to take for second dose of vaccine

    राज्यात ७२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ३२ टक्के आहे, तर १८ जिल्ह्यांमध्येपूर्ण लसीकरण झालेल्यांची टक्केवारी २५ हून कमी आहे. राज्यात ९ कोटी ७२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिल्या डोसचे सर्वाधिक ९८ टक्के लसीकरण मुंबईत तर त्या खालोखाल पुणे (९३ टक्के), भंडारा (९१ टक्के) आणि सिंधुदुर्गमध्ये (८८ टक्के) झाले आहे.



    दोन्ही डोसबाबत मुंबई प्रथम क्रमांकावर असून ५८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.  यानंतर पुण्यात ५० टक्के, भंडाऱ्यात ४५ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ४७ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

    राज्यात कोविशिल्डच्या लशीचे सुमारे ६० लाख तर कोव्हॅक्सिन लशीचे सुमारे १५ लाख अशा एकूण ७५ लाख नागरिकांनी दुसऱ्या डोसची वेळ होऊन गेली तरीही लस घेतलेली नाही. सध्या राज्यात सुमारे ५६ लाखांहून अधिक लशींचा साठा शिल्लक आहे. परंतु नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी येत नसल्याने लसीकरण कसे पूर्ण करावे, असा प्रश्न आहे.

    Most vaccinations in Mumbai, Pune and Bhandara; 75 lakh citizens are not comming to take for second dose of vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !