• Download App
    चिंताजनक : 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली झाल्या गरोदर, 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ|More than 15 thousand minor girls pregnant in 3 years in Maharashtra, increase in cases in 16 tribal districts

    चिंताजनक : 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली झाल्या गरोदर, 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात बालविवाहाच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधान परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, गोळा केलेल्या माहितीनुसार राज्यातील 16 आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत 15,253 किशोरवयीन मुली माता झाल्या आहेत.More than 15 thousand minor girls pregnant in 3 years in Maharashtra, increase in cases in 16 tribal districts



    विधानपरिषदेत बालविवाहावरील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते. त्यांनी लेखी उत्तरात सांगितले की, जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार विभागाने याबाबत माहिती गोळा करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्यात गेल्या 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक बालविवाहांची नोंद झाली आहे का आणि यापैकी १० टक्के बालविवाह रोखले गेले आहेत का, असे विचारले असता यावर लोढा यांनी आपल्या लेखी उत्तरात हे अंशतः खरे असल्याचे म्हटले आहे.

    बालविवाह हा काही जमातींच्या परंपरेचा भाग : लोढा

    मंगल प्रभात लोढा म्हणाले की, काही जमातींमध्ये बालविवाह हा परंपरेचा भाग आहे. त्यामुळे अशी प्रकरणे ओळखणे कठीण होते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार केरळपेक्षा महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी मान्य केले. 2019 ते 2021 या कालावधीत बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत 152 गुन्हेगारी प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यापैकी 136 न्यायालयात आहेत.

    More than 15 thousand minor girls pregnant in 3 years in Maharashtra, increase in cases in 16 tribal districts

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!