विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून धमकावलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. राज यांना पीएफआय या संघटनेकडून धमकावले जात आहे.Modi government to provide special security to Raj Thackeray, decision against threat from PFI
राज ठाकरे हे एक मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ते ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर राज यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे.
१२ तारखेच्या ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ईदपर्यंत म्हणजेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंग्यावर तितक्याच आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू असा इशारा राज यांनी दिला आहे. भोंग्याचा विषय हा सामाजिक असून आपण भोंग्यांविरोधातील भूमिकेवरुन मागे हटणार नाही, असे म्हटले आहे.
Modi government to provide special security to Raj Thackeray, decision against threat from PFI
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स ६.८९ टक्क्यांनी घसरले
- Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!
- Pawar NCP Karnataka : शरद पवारांचा कर्नाटक दौरा; पण राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी?? की काँग्रेस पोखरण्यासाठी…??
- शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन