विनायक ढेरे
नवी दिल्ली – मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश आणि मुंबई काँग्रेसचे एकेकाळचे दादा नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश या बाबी वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्या तरी त्याचे टार्गेट एकच आहे. मुंबई आणि कोकण प्रांतामध्ये संपूर्ण ताकद लावून भाजपने उतरण्याचे ठरविलेले दिसते. Modi Cabinet Expansion; by empowering Narayan Rane and kripa shankar singh BJP targtes Mumbai corporation and konkan prant
नारायण राणेंचे प्रभावक्षेत्र सध्या जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित असले, तरी त्यांच्याकडे महत्त्वाचे केंद्रीय मंत्रिपद सोपवून महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या मराठा नेत्याला स्थान दिल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढविण्यात येऊ शकतो. मराठा आरक्षणाचा विषय भाजपने आक्रमकपणे हाती घेण्यासाठी राणे यांना मंत्रिपदाचे दिलेले बळ कामी येऊ शकते, असा भाजप नेतृत्वाचा होरा आहे.
त्याचवेळी मुंबईत कृपाशंकर सिंह या एकेकाळच्या भाजपच्या दादा नेत्याला गळाला लावून भाजपने काँग्रेसच्या स्वबळाला टाचणीही लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर बेरजेचे राजकारण करून मुंबई महापालिकेत शिवसेनेला तोडीस तोड संख्याबळासाठी टक्कर देण्याची तयारी देखील चालविली आहे.
काँग्रेस स्वबळावर लढविण्याची तयारी करीत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले, तर नामशेष होतील अशी अवस्था आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांशी युती करून लढण्याची चिन्हे आहेत.
अशा स्थितीत कृपाशंकर सिंहांसारखे नेते भाजपकडे आणणे हे पक्षाला उपयुक्त ठरू शकते. कृपाशंकर सिंह हे सध्या काँग्रेसमध्ये अडगळीत पडले होते. त्यांनाही आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एका पक्षाची गरज होती. त्यातही भाजपसारखा सर्वांत प्रबळ पक्षाने त्यांना आपल्यात सामावून घेणे ही खुद्द कृपाशंकर सिंह यांच्यासाठी देखील राजकीय संजीवनीच मानली पाहिजे.
नारायण राणे आणि कृपाशंकर सिंह यांना बळ देणे ही भाजपच्या मुंबई आणि कोकणातल्या दीर्घकालीन राजकारणासाठी एक उपयुक्त खेळी ठरू शकते.
Modi Cabinet Expansion; by empowering Narayan Rane and kripa shankar singh BJP targtes Mumbai corporation and konkan prant
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात
- लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती
- गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान
- Monsoon Session 2021 : पावसाळी अधिवेशनात काय कामकाज झाले? कोणती विधेयके – कोणते ठराव पास झाले? वाचा सविस्तर..