विशेष प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली. याचा संतप्त ब्राह्मण समाजाने जोरदार निषेध केला आहे. Mockery of the Brahmin community by Amol Mitkari; Jayant Patil, Dhananjay Munde’s witty comedy; Brahmin society angry !!; Protest on social media!!
पुरोहित वर्ग विविध कार्यांमध्ये मंत्र उच्चारण करतो त्याची खिल्ली अमोल मिटकरींनी हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. या “एबीपी माझा”ने दिलेल्या बातमीचा व्हिडिओ आता सोशल मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ब्राह्मण समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
एखाद्या विशिष्ट व्यवसायाविषयी, एखाद्या विशिष्ट समाजाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रव्यापी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या पद्धतीने वर्तणूक करावी याविषयी सोशल मीडियातून प्रचंड नाराजी देखील व्यक्त होत आहे. ब्राह्मण पुरोहित संघ तसेच ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी यांचा निषेध केला आहे. ब्राह्मण समाजाविषयी सर्व पक्षांचे नेते ब्राह्मण मेळाव्यांमध्ये गुणगान करत असतात आणि नंतर त्यांच्या विशिष्ट राजकीय हेतूंनी ब्राह्मण समाजाला बदनाम करतात, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया व्यक्त होताना दिसत आहेत.
मध्यंतरी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाभिक समाजा विषयी असेच गैर उद्गार काढले होते. त्यावेळी नाभिक समाजाने दानवे पाटील यांचा जोरदार निषेध केला होता. अशाच प्रकारे अमोल मिटकरी, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचा सोशल मीडियातून जोरदार निषेध होताना दिसत आहे.
Mockery of the Brahmin community by Amol Mitkari; Jayant Patil, Dhananjay Munde’s witty comedy; Brahmin society angry !!; Protest on social media !!
महत्त्वाच्या बातम्या
- सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे काळाची गरज; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मत
- महिला फॅनचा श्रेयस अय्यरला लग्नाचा प्रस्ताव; क्रिकेट स्टेडियम चक्क विवाह जुळविण्याची केंद्र
- आलं अंगावर, ढकललं केंद्रावर!! : आधी पेट्रोल – डिझेल दरवाढ, वादळग्रस्तांना मदत, कोळसा पुरवठ्याचे विषय आणि आता भोंगेही!!
- चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी; बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी होणार