• Download App
    लोकसभेत मोदींना पाठिंबा, पण विधानसभेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा; राज यांनी सांगितला 225 चा आकडा!! MNS's Swabal slogan for the Assembly raj thackeray

    लोकसभेत मोदींना पाठिंबा, पण विधानसभेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा; राज यांनी सांगितला 225 चा आकडा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा दावा केला, त्या पाठोपाठ आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला असून त्यांनी देखील 225 ते 250 आकडा जाहीर केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अजून जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू व्हायच्या असताना महाराष्ट्रातल्या दोन संघटनांनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचे आकडेच सांगितल्याने विधानसभा निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. MNS’s Swabal slogan for the Assembly raj thackeray

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. काहीही झालं तरी मला विधानसभेत मनसेची लोक बसवायची आहेत. यावर काही लोक हसतील पण हे होणार, असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केला.



    राज ठाकरे म्हणाले :

    आपल्या पक्षाचा सर्वे झाला आहे. मी 5 – 5 लोकांच्या टीम बनवून प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या होत्या. सगळ्यांकडे त्यांनी विचारपूस केली आहे. आज तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणून परत जिल्ह्यात येतील ते तुम्हाला भेटतील. परिस्थिती समजावून सांगा, आकलन करा. काय घडू शकतं होऊ शकतं याचा विचार करा. मी खरंच सांगतो, निवडून येण्याची क्षमता आणि तयारी असलेल्यांनाच तिकीट दिलं जाईल. जिंकून आल्यावर पैसे काढायला मोकळा अशा कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही.

    तुम्ही जे बोलाला, जे जिल्हा आणि तालुका अध्यक्षांना सांगाल ती माहिती प्रमाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक करणार आहोत.

    विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मनसेचे आपले सर्व पदाधिकारी काहीही करुन सत्तेवर बसवायचे आहेत. अनेक लोक हसतील. हसू देत. मला काही हरकत नाही त्याला. पण ही गोष्ट घडणार म्हणे घडणार!!

    मी यादी घेऊन बसलो होतो. अशी परिस्थिती मी कधी पाहिली नाही. सगळे मतदारसंघ पाहत होतो. कोण कोणत्या पक्षात आहे विचारावं लागतं. कोण कुठे गेला आहे काही कळत नाही. विधानसभेला होणारं घमासान न भुतो असं असेल!!

    मनसेचा बिनशर्त पाठिंबा

    मनसेने लोकसभेला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभेला मनसेने एकला चलो चा नारा दिला असून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केले. लोकसभेला राज ठाकरेंना महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी जिथे जिथे प्रचारसभा घेतल्या तिथे महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. आता राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा आढावा घेण्यासाठी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत.

    MNS’s Swabal slogan for the Assembly raj thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस