प्रतिनिधी
कोल्हापूर : मुंबई महापालिकेसह राज्यातील 16 महापालिका निवडणूक येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत मनसेची युती होईल, अशी चर्चा जोरदार होती, मात्र या सर्व चर्चेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पडदा टाकला आहे. येणाऱ्या निवडणूक मनसे स्वबळावरच लढवणार आहे, हे आपण याआधीही जाहीर केले होते, माध्यमे मला वारंवार प्रश्न विचारून माझ्याकडून हे वदवून का घेत आहेत??, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला आहे. MNS will fight on its own in all municipalities including Mumbai
राज्यपालांनाही कुणी स्क्रिप्ट देते का?
राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली. मी त्या माणसाबद्दल काय बोलावे ते कळतच नाही. ते अशा एका पदावर आहे की ज्यामुळे आपण काही बोलू शकत नाही.
नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राजकारणात असे अनेक लोक आहेत जे काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसे आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसे आहे, पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावे याबद्दल कळत नाही. मला तर असे वाटते की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देते का? तुमचे सगळे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असेही राज ठाकरे म्हणाले.
सीमाप्रश्न अचानक कसा आला?
राज ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका मांडली. मला हा विषय मध्येच कुठून येतो ते कळले नाही. असा सीमाप्रश्न अचानक मध्ये कसा येतो? म्हणजे आपले लक्ष दुसरीकडे कुणाला वळवायचे आहे का?, असा खोचक सलाल राज ठाकरे यांनी केला. ज्यांना आमची ताकद बोचते ते अशाप्रकारचे आरोप करत सूटतात. यांचे विरोधक दोन दिवसांपूर्वी सांगायचे की त्यांच्यासाठी काम करतात. मी कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
MNS will fight on its own in all municipalities including Mumbai
महत्वाच्या बातम्या