• Download App
    रुपाली ठोंबरे- पाटील यांचा मनसेला रामराम कोणत्या पक्षात प्रवेश करणार गुलदस्तात|Mns Leader Rupali Thombre Patil Resigned

    WATCH : रुपाली ठोंबरे- पाटील यांचा मनसेला रामराम कोणत्या पक्षात प्रवेश करणार गुलदस्तात

    वृत्तसंस्था

    पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा मनसेचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे दिला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे.Mns Leader Rupali Thombre Patil Resigned

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवस राज ठाकरे हे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला.



    मनसेच्या रणरागिणी अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे.

    या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं नमूद केलं आहे.दरम्यान, रुपाली पाटील या कोणत्या नवीन पक्षात प्रवेश करणार याची अधिकृत माहिती नाही.

    • रुपाली ठोंबरे- पाटील यांचा मनसेला रामराम
    • राज ठाकरे पुण्यात येण्यापूर्वी उचलले पाऊल
    • एका मुलाखतीत दिला होता पक्ष सोडण्याचा इशारा
    • आज राजीनामा देत पक्षाला धक्का
    • कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्तात
    • पालिका निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार

    Mns Leader Rupali Thombre Patil Resigned

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!