• Download App
    गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी!!|MNS banners put infront of Shivsena bhavan declaring Raj Thackeray as further chief minister raised political eyebrows

    गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलतात? कुणाचे वस्त्रहरण करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुसऱ्या दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाली आहे. ठाकरे घराण्यातील कोणीही सरकार मधले सत्तापद स्वीकारणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिज्ञा होती. ती बाजूला सारून उद्धव हे पहिले ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकवून दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाली आहे.MNS banners put infront of Shivsena bhavan declaring Raj Thackeray as further chief minister raised political eyebrows



    राज ठाकरे यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून मनसेने शिवसेना भवनासमोर आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे.दादरमधील शिवसेना भवनासमोर हे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेच्या माहिम विधानसभा शाखेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर्स लावले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे… असा उल्लेख या बॅनर्सवर करून हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे. तर खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे.

    राजकीय चर्चांना उधाण

    अगदी शिवसेना भवनाच्या समोरच हे मोठे बॅनर्स लावण्यात आल्याने हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाजी पार्क मैदानाकडे जाताना जिप्सी हॉटेलच्या समोर हे बॅनर्स दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. या बॅनर्समुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून सादर केले जाणार का?, अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

    राज यांच्या घरासमोरही बॅनरबाजी

    राज ठाकरे यांच्या घरासमोरही झेंडे, बॅनरने पूर्ण परिसर सजला आहे. गुढी पाडवा आणि मराठी नववर्षा निमित्त आज शिवाजीपार्कवर राज ठाकरे यांची सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. नवा संकल्प, नवी दिशा घेऊन आज राज ठाकरे आपल्या घरावर यशाची गुढी उभारणार आहेत. सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर, घरावर फुलांच्या माळा, मनसेचे झेंडे लावून पूर्ण परिसर सजवला आहे. सायंकाळी निघणाऱ्या या शोभा यात्रेसाठी ट्रकही सजल्या आहेत.

    MNS banners put infront of Shivsena bhavan declaring Raj Thackeray as further chief minister raised political eyebrows

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा