• Download App
    वर्षा’वरील स्नेहभोजनाला आमदार संजय शिरसाटांची सांगून गैरहजेरी, पण माध्यमांची नाराजीच्या चर्चेची उताविळी!MLA Sanjay Shirsat's alleged absence from Varsha's dinner

    वर्षा’वरील स्नेहभोजनाला आमदार संजय शिरसाटांची सांगून गैरहजेरी, पण माध्यमांची नाराजीच्या चर्चेची उताविळी!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावाला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. MLA Sanjay Shirsat’s alleged absence from Varsha’s dinner

    मात्र या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट हे सांगून आणि पूर्वपरवानगीने गैरहजर राहणार आहेत. पण माध्यमांनी मात्र शिरसाट हे नाराज असल्याने भोजनाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा सुरू केली आहे. ही चर्चा सुरू होताच शिरसाट यांनी आपण नाराज नसल्याचा स्पष्ट खुलासा माध्यमांकडे केला आहेच, पण तरी देखील माध्यमांमधल्या शिरसाट यांच्या नाराजीच्या बातम्या थांबायला तयार नाहीत. उलट संजय शिरसाट सांगून सवरून वर्षावरल्या स्नेह भोजनाला गैरहजर राहत आहेत. पण माध्यमेच चर्चेची उताविळी दाखवत असल्याचे यातून दिसून येत आहे.

     शिरसाट नाराज?

    शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना स्थान न देण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत आहेत. पण संजय शिरसाट यांनी मात्र यात कुठलेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तुम्ही अशा बातम्या पसरवू नका. मी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांसाठी मी त्यांची पूर्वपरवानगी देखील घेतली आहे. त्यामुळे नाराज असण्याचं काहीच कारण नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी मला त्या कामासाठी ती परवानगी दिली आहे त्यामुळे मी तिथे जात आहे, असे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

    MLA Sanjay Shirsat’s alleged absence from Varsha’s dinner

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!