प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण सहाव्या दिवशी मराठा आंदोलकांनी मराठवाड्यात मोठी जाळपोळ केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आणि गाडी पेटवली. त्या पाठोपाठ बीडमध्ये राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय जाळले. MLA Sandeep Kshirsagar’s house was also set on fire
राष्ट्रवादीचे दुसरे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरांनाही आगी लावल्या, इतकेच नाहीतर रस्त्यावरची वाहने देखील मराठा आंदोलकांनी पेटवली.
आंदोलन भरकट चालण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिला होता जरांगे पाटलांनी देखील आंदोलकांनी जाळपोळ करू नये, असा इशारा दिला होता. परंतु मराठा आंदोलन ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आज दोन आमदारांच्या घरांना आणि गाड्यांना आगी लावल्या.
क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेली शिक्षण संस्था के. एस. के. कॉलेजच्या कार्यालयात देखील आंदोलकांनी आग लावली. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धुळे सोलापूर रस्त्यावर हॉटेल सनराइजला देखील आंदोलकांनी आग लावली समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुभाष राऊत यांचे हे हॉटेल आहे. बीड शहराचे मुख्य बाजारपेठ सुभाष रोडवर आंदोलकांनी दोन मोटरसायकल पेटवल्या आणि दगडफेक केली त्याबरोबर संपूर्ण बाजारपेठ बंद करावी लागली.
MLA Sandeep Kshirsagar’s house was also set on fire
महत्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर, मृतांची संख्या 13 वर, ड्रायव्हरने सिग्नल ओव्हरशूट केल्याने दुर्घटना
- ‘आप’च्या राजवटीत दिल्ली गुदमरत आहे’ बांसुरी स्वराज यांनी केजरीवाल सरकारवर केली टीका
- आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, मृतांची संख्या ९ वर पोहचली, ४० पेक्षा अधिकजण जखमी
- ना बंड, ना आदळआपट; मध्य प्रदेश भाजपात सहज सांधा बदल; काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी यातून काही शिकतील??