• Download App
    ‘’... त्यावेळी ‘उबाठा’ गटाने आपल्या तोंडाची "गटारे" बंदच ठेवावीत’’ आशिष शेलारांचा घणाघात! MLA Ashish Shelar criticizes Uddhav Balasaheb Thackerays group due to waterlogging on the roads of Mumbai in the first rain

    ‘’… त्यावेळी ‘उबाठा’ गटाने आपल्या तोंडाची “गटारे” बंदच ठेवावीत’’ आशिष शेलारांचा घणाघात!

    ‘’… आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते.’’ असा टोलाही लगावला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  राज्यात मान्सून दाखल झाला असून, मुंबईसह राज्यभरात  सर्वत्र काल आणि आज सकाळी दमदार हजेरी लावली. मुंबईत नेहमीप्रमाणे रस्त्यांवर पाणी साचले असून, विविध मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:  परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष विविध ठिकाणी पोहचले. दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने मुंबई महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. MLA Ashish Shelar criticizes Uddhav Balasaheb Thackerays group due to waterlogging on the roads of Mumbai in the first rain

    आशिष शेलार ट्वीटमध्ये म्हणतात, ‘’जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती, भाजपाने उन्हातान्हात उतरुन पाहाणी करुन, नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. वर्षानुवर्षांचे तेच कंत्राटदार, तीच पध्दत, तीच अपारदर्शकता, अधिकाऱ्यांची तीच लपवाछपवी, त्यामुळे  कालच्या पहिल्या पावसातच पालिकेचे दावे वाहून गेले.’’

    याचबरोबर ‘’पालिकेने अजूनही कंत्राटदारांची बाजू न घेता, काही उपाययोजना करता आल्या तर करव्यात. वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी! बाकी,मुंबईकरांचे तथाकथित रखवालदार उबाठाचे माजी नगरसेवक, माजी महापौर या काळात गायब होते आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते.’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

    याशिवाय ‘’त्यामुळे उबाठाने वर्षानुवर्षे पोसलेल्या कंत्राटदारांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल  त्यावेळी…उबाठा गटाने आपल्या तोंडाची “गटारे” बंदच ठेवावीत! उबाठा आणि उबाठाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक “परिवार” तयार झालाय, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’’ असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

    MLA Ashish Shelar criticizes Uddhav Balasaheb Thackerays group due to waterlogging on the roads of Mumbai in the first rain

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!