- या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले. Miraj: Vehicles of Karnataka blown up by angry Shiv Sainiks
विशेष प्रतिनिधी
सांगली : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली.शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ सांगलीच्या मिरज मध्ये कर्नाटक मधील काही खाजगी गाड्यांची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.तसेच बंगळुरुमधील या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत.
नेमकी घटना काय घडली
शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटक गाड्या जाणाऱ्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले.कर्नाटकमधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या. त्यापैकी दोन गाड्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.
घटनेची माहिती मिळताच याप्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, महादेव हूलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे, दिलीप नाईक, प्रकाश जाधव, किरण कांबळे, यांना घटनास्थळवरून ताब्यात घेतले.
Miraj : Vehicles of Karnataka blown up by angry Shiv Sainiks
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!!
- पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार ; हल्ल्यात तरुण जखमी
- मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न – जयंत पाटील
- द कपिल शर्मा शो : ‘ तू मराठी का बोलत नाही?’ ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले