याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगले पेटले आहे. दरम्यान आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. Minister Hasan Mushrifs car vandalized announcements made in support of Maratha reservation
एएनआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
घटनेच्या वेळी मंत्री मुश्रीफ गाडीत उपस्थित नव्हते. मंत्र्यांच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या घरांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एएनआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये गाडी फोडणारे मराठा आरक्षणासाठी घोषणा देताना दिसत आहेत.
यादरम्यान दोघेही मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहेत. दोघांनी मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. मुंबईतील कुलाबा येथील आकाशवाणीजवळील आमदार निवासात मंत्र्यांची गाडी उभी होती, असे सांगण्यात येत आहे.
Minister Hasan Mushrifs car vandalized announcements made in support of Maratha reservation
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!
- कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
- पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर
- दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी