• Download App
    CM Devendra Fadnavis- मायक्रोसॉफ्टकडून डिजिटल गव्हर्नन्स मॉडेलला

    CM Devendra Fadnavis : मायक्रोसॉफ्टकडून डिजिटल गव्हर्नन्स मॉडेलला सहकार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-बिल गेट्स यांच्यात चर्चा

    CM Devendra Fadnavis-

    प्रतिनिधी

    मुंबई : CM Devendra Fadnavis राज्यातील शासकीय कामामध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि राइट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दीदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी गेट्स फाउंडेशनने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाउंडेशनचे बिल गेट्स यांच्यात गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली.CM Devendra Fadnavis

    फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाउंडेशनने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नवी मुंबईत ३०० एकर परिसरात इनोव्हेशन सिटी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गेट्स यांना दिली. इनोव्हेशन सिटी आणि इतर उपक्रमांसाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही गेट्स यांनी या वेळी दिली.



    मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी गेट्स फाउंडेशनचे प्रयत्न : महाराष्ट्रात डासांमुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच डेंग्यू नियंत्रणासाठी गेट्स फाउंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याची ग्वाही बिल गेट्स यांनी दिली.

    २५ लाख लखपती दीदींसाठीही भागीदारी

    क्रिस्पर केस नाइन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी भागीदारी करणार आहे. फडणवीस यांनी महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितले.

    Microsoft supports digital governance model; CM Devendra Fadnavis-Bill Gates hold talks

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस