विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे मेट्रोचे उद्घाटन केवळ पावसामुळे पुढे गेले, पण त्याचे निमित्त करून काँग्रेससह बाकीच्या विरोधी पक्षांनी पुण्यात आंदोलन केले. त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात विरोधकांना घेरले. मेट्रोच्या कामातला एकही पिलर न टाकणाऱ्या विरोधकांनी नुसत्या छात्या बडवल्या, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांवर प्रहार केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो आपल्याला वारसा दिला, तो पुढे नेणारा आजचा कार्यक्रम आहे. भिडे वाड्यात मुलीची पहिली शाळा सुरु झाली. अनेक लोक त्या काळात दुस्वास करायचे. विरोध करत होते. शेणाचे गोळे, दगड धोंडे फेकायचे. पण सावित्रीबाई फुले मागे हटल्या नाहीत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यामागे उभे होते. शाळा सुरु झाली. त्या एका शाळेने मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. हा शिक्षणाचा, समाज सुधारणेचा वारसा आपल्याला मिळाला आहे. त्या वारशाची आठवण करुन देणारं स्मारक भिडे वाड्यात करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला.
भुजबळ साहेबांनी इतिहास सांगितला. कशाप्रकारे वर्षानुवर्ष भिडे वाडा मिळाला पाहिजे म्हणून लढाई सुरु होती. अतिशय कमी कालावधीत सुंदर प्रकारच स्मारक पुढची 100, 200, 500 वर्ष प्रेरणा देत राहिल ते सुरु होतय. म्हणून मनापासून अभिनंदन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पुणे समाजसुधारकांची भूमी आहे. आज वारशाचा जसा कार्यक्रम आहे, तसा विकासाचा सुद्धा आहे.
पुणे मेट्रोच उद्घाटन पुढे गेलं, म्हणून काही लोक छाती बडवत होते. ज्यांनी कधी एक पिलर उभारला नाही, ते छाती बडवण्यात पुढे होते. काहीतरी करुन दाखवा, मग छात्या बडवा. 2014 साली युती सरकार आल्यानंतर पुणे मेट्रोल गती मिळाली. पुणे मेट्रोची काम वेगात पूर्ण झाली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा हा देशात वेगाने पूर्ण होणारा पहिला टप्पा आहे.
Metro Pune inauguration Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Udaynidhi Stalin : सनातन धर्माला शिव्या देणाऱ्या चिरंजीवाला स्टालिन यांची बक्षिसी; उदयनिधी तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदी!!
- ‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
- Jaish e Mohammed : काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला ; जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक
- Mahatma Phule : महात्मा फुले ब्राह्मणांचे विरोधक नव्हते, ते फक्त ब्राह्मण्यवादाचे विरोधक, त्यांनी ब्राह्मणांच्या वाड्यात शाळा काढल्या!!