• Download App
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणे बसपा नेत्याला महागात, माजी मंत्री राजकिशोर यांची पक्षातून मायावतींनी केली हकालपट्टी Meeting Chief Minister Eknath Shinde Costs BSP Leader Ex-Minister Rajkishore Expelled from Party

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणे बसपा नेत्याला महागात, माजी मंत्री राजकिशोर यांची पक्षातून मायावतींनी केली हकालपट्टी

    प्रतिनिधी

    लखनऊ : एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांनी यूपीमध्ये आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे, यामुळे बसपा सुप्रीमो मायावती नाराज झाल्या होत्या. Meeting Chief Minister Eknath Shinde Costs BSP Leader Ex-Minister Rajkishore Expelled from Party

    राजकिशोर हे बस्ती भागातील नावाजलेले नेते आहेत. ते तीन वेळा आमदार झालेले आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द बसपामधूनच सुरू केली. त्यानंतर ते सपामध्ये दाखल झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर डिंपल हेही राजकारणात सक्रिय आहेत. सपा सरकारमध्ये त्यांना ऊर्जा सल्लागारही करण्यात आले होते. नंतर दोघेही काँग्रेसमध्ये गेले.



    2020 मध्ये त्यांनी पुन्हा बसपमध्ये प्रवेश केला होता. बस्तीचे बसपाचे जिल्हाध्यक्ष जयहिंद गौतम यांनी पत्र जारी करताना दोघांचीही बसपातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली आहे. शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत होते. या दोन्ही नेत्यांनी अयोध्येत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

    Meeting Chief Minister Eknath Shinde Costs BSP Leader Ex-Minister Rajkishore Expelled from Party

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस