वृत्तसंस्था
पुणे : राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे.Medical, funeral for this reason ‘E-pass’ issued by Pune Police;Till date, 60,000 applications have been received
वैद्यकीय कारण व नातेवाईकाचे निधन, या दोन प्रमुख कारणासाठी सध्या ई पास दिला जात आहे. विशेष म्हणजे पासचा अर्ज २४ तासात मंजूर होतो.
तब्बल ६० हजार अर्ज
ई पास सेवा सुरु केल्यानंतर पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ५९ हजार ५७७ अर्ज सोमवारी आले होते. पुणे पोलिसांनी १६ हजार ७९२ जणांना डिजिटल पास वितरित केले आहेत. त्याचवेळी ३१ हजार ७९० अर्ज नामंजूर झाले आहेत.
ई पाससाठी असा करावा अर्ज :
पोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़. त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी.
तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.
शहरात अत्यावश्यक कामासाठी पासची गरज नाही :
शहरातल्या शहरात अत्यावश्यक कामासाठी ई पासची आवश्यकता नाही. मात्र, घराबाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे योग्य व पटेल असे कारण हवे. अनेक जण शहरातल्या शहरात जाण्यासाठी ई पासासाठी अर्ज करतात.
तसेच काही जण अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही वाहतुकीसाठी अर्ज करतात. अशाचे अर्ज फेटाळण्यात येतात.
किती वेळात मिळतो पास :
प्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात.
त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो.
हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो.
Medical, funeral for this reason ‘E-pass’ issued by Pune Police;Till date, 60,000 applications have been received
महत्त्वाची बातमी
- बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश
- बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे
- बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत
- जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी व्यक्त केला शोक
- India Corona Updates : देशात 24 तासांत 3.57 लाख नवीन रुग्णांची नोंद, 3449 मृत्यू; आतापर्यंत 2 कोटींहून जास्त कोरोनाबाधित