• Download App
    महापौर मोहोळ यांनी पुण्यातील ' या ' कुटुंबीयांना दिला अनोखा आधार ।Mayor Mohol gave unique support to 'this' families in Pune

    महापौर मोहोळ यांनी पुण्यातील ‘ या ‘ कुटुंबीयांना दिला अनोखा आधार

    मागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता. Mayor Mohol gave unique support to ‘this’ families in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : यंदाच्या दिवाळीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवळपास पाच हजार कुटूंबियांना फराळ देऊन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.मागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता.

    यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की , गेल्या दीड ते पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबांवर दुःखाचे सावट पसरले होते. ज्यांनी ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य कोरोणामुळे गमावले, त्यांचे आपण दुःख कमी करू शकलो नाही तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दिवाळी संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’



    पुढे मोहोळ म्हणाले की , आपल्या हिंदू संस्कृतीत अशी प्रथा आहे की , जर कुटूंबियांतील एखादा सदस्य मृत्यू पावला तर जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात सगळीकडेच नकारात्मक वातावरणात निर्माण झाले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर नाहीसा करून आनंदाची नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते.

    Mayor Mohol gave unique support to ‘this’ families in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!