अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सांताक्रूझ परिसरात असलेल्या गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली आहे. आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच हॉटेलच्या मोठ्या भागात आग पसरली. Massive fire breaks out at Galaxy Hotel in Mumbai three dead five injured
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून उर्वरित हॉटेल रिकामे करण्यात आले आहे. मात्र, या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना आग लागल्याची माहिती मिळताच लोक बाहेर येऊ लागले. त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. घाईघाईने संपूर्ण हॉटेल रिकामे करण्यात आले आहे.
Massive fire breaks out at Galaxy Hotel in Mumbai three dead five injured
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने उकडलेल्या तांदळावर लावले 20 टक्के निर्यात शुल्क , बिगर बासमती तांदळावर आधीच बंदी
- ‘…आणखी किती बिहारी मरण्याची वाट पाहताय मुख्यमंत्री’ नितीश कुमार सरकारवर चिराग पासवान यांचे टीकास्त्र!
- हरियाणातील नूहमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘विहिंप’ पुन्हा ब्रजमंडल यात्रा काढणार!
- बारामतीत वडील – मुलीने टाळले स्वागत; पण काकांच्या पुतण्याचे मात्र भव्य शक्तिप्रदर्शन!!; राजकीय इंगित काय??