विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kalyan कल्याण येथील योगीधाम अजमेरा हाइट्स संकुलातील मराठी कुटुंबाला मारहाण आणि हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला एमटीडीसीचा निलंबित अधिकारी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्लासह ६ जणांना खडकपाडा पोलिसांनी शनिवारी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.Kalyan
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी गीता शुक्ला, पार्थ जाधव आणि विजय जाधव यांनाही अटक केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून कल्याण न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धूपबत्तीच्या धुरावरून गीता शुक्लाचे शेजाऱ्यांशी भांडण झाले होते.
तेव्हा अखिलेश शुक्लाने बाहेरील माणसे बोलावून शेजारी राहणारे धीरज देशमुख, त्यांचा भाऊ अभिजित देशमुख, लता कळवीकट्टे या कुटुंबीयांना मारहाण केली होती. या हल्ल्यात अभिजित देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्लाने मराठी माणसाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते.
Marathi family assault case in Kalyan; 6 people including Shukla’s wife remanded in police custody for 6 days
महत्वाच्या बातम्या
- पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत ‘या’ वस्तू महागल्या!
- परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर
- खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!
- Sarangi : भाजप खासदार सारंगी अन् राजपूत यांच्या प्रकृतीबाबत आले अपडेट!