• Download App
    ठाकरे - पवारांच्या काळात मराठा आरक्षण गेले, समाजकंटक जातीय सलोखा बिघडतायत; मुख्यमंत्र्यांचा घणाघात Maratha reservation went during Thackeray-Pawar period

    ठाकरे – पवारांच्या काळात मराठा आरक्षण गेले, समाजकंटक जातीय सलोखा बिघडतायत; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

    प्रतिनिधी

    बुलढाणा : मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले आणि आज समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवायचा प्रयत्न करत आहेत, पण तो आम्ही बिघडू देणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे दिला. Maratha reservation went during Thackeray-Pawar period

    शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आंदोलन आणि आरक्षण या विषयावर सविस्तर भूमिका मांडली.

    मुख्यमंत्री म्हणाले :

    • शुक्रवारची घटना दुर्दैवी आहे. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल. पण मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारच्या काळात गेले आज समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही तो बिघडू देणार नाही.
    • अशोक चव्हाण यांनी तरी मराठा आरक्षणासाठी काय केले?? लाखा-लाखांचे 58 मूक मोर्चे निघाले होते. लोक ते विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरू आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, याची माहिती सरकारकडे येत आहे त्यावर निश्चित कारवाई होईल.
    • मी 3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठीक नाही. आपण चर्चा करू, असे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी उपोषण केले. पण आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे आम्ही समर्थन करत नाही.
    • जालनामध्ये घडलेल्या घटनेची गरज लागल्यास न्यायालयीन चौकशी होणार असून तिथले पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना मी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही

    आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल.

    Maratha reservation went during Thackeray-Pawar period

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा