प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रणकंदन पेटले असताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे – फडणवीसांच्या सरकारवर आज निशाणा साधला. maratha reservation news says eknath shinde
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले. ते त्यांनीच घालवले, अशी घणाघाती टीका एकनाथशिंदे यांनी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले :
मराठी बाण्यावर बोलणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याकाळात मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात ते चॅलेंज झाले. पण ते टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केले.
सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते?? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?? त्यांनी हे आरक्षण टिकवले नाही?? खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता-भगिनींचा अपमान करणारे कोण होतं हे देखील सकल मराठा समाजाला माहिती आहे.
मराठा समाजाचे आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. या सर्वाला कारणीभूत असणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार उरलेला नाही.
मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले तेव्हा किती लक्ष दिले?? तुम्ही किती पुरावे दिले?? मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही हे न्यायालयाने जेव्हा म्हटले त्यावेळी मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही न्यायालयात द्यायला हवे होते. तुम्ही तिथे कमी पडलात. अपयशी झाला. तुम्ही ते मुद्दाम केले. या सर्व गोष्टी मराठा समाजाला माहिती आहे.
मराठा समाज शिस्तप्रिय आहे. मराठा समाज शांततेने आंदोलन करणारा आहे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही करू शकलो नाही, पण हे करण्याचं प्रयत्न करत आहेत, असं त्यांना वाटत आहे.
maratha reservation news says eknath shinde
महत्वाच्या बातम्या
- Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!
- मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय
- बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक
- अमृता खानविलकरची ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण!