Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज समजितसिंह घाटगे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. मराठा समाजाने आता सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. लॉकडाऊननंतर मराठा आरक्षणासाठी लढ्याची दिशा ठरवणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असंही घाटगे म्हणाले. मराठा समाज आपला हक्क मागत आहे, भीक मागत नाही. यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. मराठा आरक्षणाबाबत काल मुंबईत भाजप नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला समरजितसिंह घाटगेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा आणि भेटीगाठी घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आंदोलनाला फूस लावण्याचा प्रयत्न भाजपने कधीही केलेला नाही, तसं असतं तर वर्षभरापूर्वीच आंदोलनं झाली असती, असं सांगत घाटगे यांनी भाजपवर होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. Maratha Reservation Agitation After Lockdown From Kolhapur Says BJP Leader Samarjitsinh Ghatage
महत्त्वाच्या बातम्या
- Worlds Largest Iceberg : जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटून वेगळा, दिल्लीपेक्षाही तिप्पट मोठे आकारमान
- होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख्र
- नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम
- रामभक्त कधीच खोटे बोलत नाही …जय श्री राम!
- कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत