विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pankaja Munde मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट नुसार शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले. यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करत आज त्याची बैठक देखील पार पडली. ही बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.Pankaja Munde
या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे. तर सरकारने काढलेल्या जीआरमधील मराठा शब्दावर आक्षेप घेत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसतोय, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.Pankaja Munde
पंकजा मुंडे म्हणाल्या, बैठकीत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यामध्ये, ओबीसी हिताच्या बाबतीत निर्णय झाले आहेत. जागृतपणे निर्णय होत आलेले आहेत, ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत, मिळणारे लाभ योजना, निधी यावर चर्चा झाली. तसेच, मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचीही चर्चा झाल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पुढच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले पाहिजे, निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणखी लोक ओबीसीत घेण्याचे स्वागत होत नाही. मात्र, कुणबी नोंदणीसंदर्भात आमचे कोणतेही म्हणणे नाही. मात्र, अवैद्य नोंदी दिल्या जाऊ नये, यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी. तर, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे.
छगन भुजबळांचे अनुभवाचे बोल- पंकजा मुंडे
छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, छगन भुजबळ नाराज आहेत असे म्हणता येणार नाही, त्यांचे अनुभवांचे बोल आहेत. त्याला नाराजी म्हणता येणार नाही. तसेच पारंपरिक कुणबी प्रमाणपत्राबद्दल आमचा विरोध नाहीच, पण अवैद्य दाखले दिले गेले तर आमच्या अधिकारावर गदा येईल, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
Pankaja Munde, OBC, Maratha Reservation, GR, Chhagan Bhujbal, PHOTOS, VIDEOS, News
महत्वाच्या बातम्या
- EU ने भारतावर टेरिफ लादण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची धमकी; पण मोदींची चर्चा इटलीच्या पंतप्रधानांशी!!
- उद्धव ठाकरे “फक्त” कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थावर; अडीच तासांच्या चर्चेत म्हणे नव्हते “राजकारण”!!
- Karnataka Government : कर्नाटक सरकारने म्हटले- राष्ट्रपती व राज्यपाल हे फक्त नाममात्र प्रमुख; केंद्र व राज्यांतील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करण्यास बांधील
- Government : 22 सप्टेंबरपासून बिस्किटे-टूथपेस्टसारखी उत्पादने स्वस्त मिळणार; सरकारने कंपन्यांना जुन्या स्टॉकची MRP बदलण्याची परवानगी