• Download App
    १३५ वर्षांनी आनंदाश्रमातील हस्तलिखिते पुणेकरांसाठी खुली होणार योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणांवरील पुरातन ठेवा|Manuscripts of 'Anandashram' will be open for Pune residents after 135 years

    १३५ वर्षांनी आनंदाश्रमातील हस्तलिखिते पुणेकरांसाठी खुली होणार योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणांवरील पुरातन ठेवा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आपल्या पूर्वजांनी योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणे अशा अनेक विषयांवर आपले ज्ञान हस्तलिखितांद्वारे शब्दबद्ध केले आहे. नूमवि प्रशालेजवळील ‘आनंदाश्रम’ या ऐतिहासिक संस्थेत सुमारे १५,००० हस्तलिखिते आहेत. १३५ वर्षांमध्ये प्रथमच आनंदाश्रमातील हा अमूल्य ठेवा पुणेकरांसाठी बघायला खुला होणार आहे. Manuscripts of ‘Anandashram’ will be open for Pune residents after 135 years

    आनंदाश्रम परिक्रमा हा उपक्रम म्हणजे लक्षवेधी घटना ठरणार आहे. २५, २६ आणि २७ फेब्रुवारीला होणाऱ्या हस्तलिखितांच्या या प्रदर्शनात, प्रदर्शनाबरोबरीनेच संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील पुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.



    पुण्यात अशी एक संस्था आहे, जी १३५ वर्षे अप्पा बळवंत चौकाजवळ, आपल्या इतिहासाचा ठेवा जपून ठेवत दिमाखात उभी आहे, त्या संस्थेचे नाव आनंदाश्रम. कै. म. चिं. आपटे या विद्वान व्यक्तीने भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या विषयांवरील हस्तलिखिते आणली. या विषयावर संशोधन करणारी आनंदाश्रम ही संस्था उभी केली. १३५ वर्षे भक्कमपणे उभ्या असलेल्या या संस्थेत जवळजवळ १५,००० हस्तलिखिते आहेत.

    संस्कृत, प्राकृत मराठी, मोडी, तामिळ आणि तेलगू भाषेतील ही हस्तलिखिते आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहेत. यावर अनेक संशोधक आपले संशोधन कार्य सखोल अभ्यास करून पूर्ण करतात.

    आनंदाची पालखी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात आनंदाश्रम या वास्तूत सजणार आहे. या पालखीचे भोई असणार आहेत, पुण्यातील सुनिधी पब्लिशर्स, कोलंबस पब्लिशिंग अँड सर्विसेस, ओनामा शैक्षणिक खेळणी आणि पूर्णम् इकोव्हिजन फाऊंडेशन या ४ संस्थांनी हा उपक्रम आयोजित केला आहे.

    Manuscripts of ‘Anandashram’ will be open for Pune residents after 135 years

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा