विशेष प्रतिनिधी
धाराशिव : Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचे ते म्हणालेत. एवढेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय नोकर भरती न करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे व सरकारमधील वाक्युद्ध एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Manoj Jarange Patil
मनोज जरांगे मंगळवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कळंब तालुक्यातील डिकसळ येथे पत्रकारांशी संवाद साधून आपल्या शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एक राज्यव्यापी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी आपल्याला सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. केवळ वावरात फिरल्याने किंवा भाषणबाजी केल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार उभा राहणार नाही. या प्रकरणी इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत कुणी आंदोलन केले असेल असे आंदोलन उभे करावे लागेल. तेव्हाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, असे ते म्हणाले.Manoj Jarange Patil
सरकारला 15 दिवसांची दिली मुदत
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी 15 दिवसांची वाढीव मुदतही दिली आहे. शेतकरी देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. पण कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय सरकारने कोणतीही नोकर भरती करू नये, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने 2 सप्टेंबर रोजी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर जारी केला. या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाल्याचा दावा केला जात आहे.
धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगेंवर घणाघात
दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून मनोज जरांगेंवर कडाडून हल्ला चढवला आहे. हैदराबाद गॅझेटियर समोर आले नसते, तर आपण वंजारी समाज केवळ पाथर्डीमध्येच नाही तर, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांतही एसटीएमध्ये आहोत हे कळलेच नसते. आम्हाला अगोदरच माहिती होते की, आपण एसटीमध्ये आहोत. कारण, परळी हे तेलंगणाच्या सीमेजवळ येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे होते तेव्हापासून सर्वांना माहिती आहे की, आपले अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत आणि आपण इकडे व्हीजेएनटीमध्ये आहोत.
पण आता हैदराबाद गॅझेटियरनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटियरमधील एकेका शब्दाचा कुणाला फायदा होत असेल, तर तो आम्हाला देखील झाला पाहिजे. कारण, आपले 2 टक्क्यांमध्ये बरे चालले होते. पण आता काहीजण हे दोन टक्के काढण्याची भाषा करत आहेत. जे लोक अशी भाषा करत आहेत, त्यांना सांगतो आम्ही तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता आम्हाला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण हवे आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Threatens ‘100-Year Unprecedented’ Farmers’ Protest Post-Diwali; Demands Halt on Recruitment Until Kunbi Certificates Issued
महत्वाच्या बातम्या
- उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिंदे सेनेचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला शह; दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश
- Madagascar : आता मादागास्करमध्ये GenZ कडून सत्तापालट; राष्ट्रपती लष्करी विमानातून फ्रान्सला पळून गेल्याचा दावा
- Bihar Elections, : बिहारमध्ये काँग्रेसची 243 जागा लढवण्याची तयारी; दिल्लीत खरगेंच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
- महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे; पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि भावी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!