Friday, 9 May 2025
  • Download App
    Manoj jarange संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या जरांगेंच्या

    Manoj jarange : संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या जरांगेंच्या गर्जना; प्रत्यक्ष लढण्यात आणि पाडण्यात आपला “निवडक” मराठवाडाच बरा!!

    Manoj jarange

    Manoj jarange

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manoj jarange संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या मनोज जरांगेंनी गर्जना केल्या. परंतु, प्रत्यक्ष लढण्यात आणि पाडण्यात आपला “निवडक” मराठवाडाच बरा!! असे त्यांनी जाहीर केलेल्या मतदारसंघांवरून चित्र समोर आले आहे.Manoj jarange

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकण्याच्या गर्जना जरी मनोज जरांगे यांनी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात  त्यांनी लढण्याचे आणि समोरचे उमेदवार पाडण्याचे मतदारसंघ जाहीर केले, ते सगळे मराठवाड्यातलेच आहेत, ते देखील 48 पैकी फक्त 15 आहेत!!



    मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी मराठा मुस्लिम आणि दलित कॉम्बिनेशन उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संभाजी राजे छत्रपती राजू शेट्टी वगैरे स्थानिक नेत्यांच्या तिसऱ्या आघाडीशी आघाडी करण्यास किंवा त्यांच्यात सामील होण्यास नकार दिला पण त्यांनी उत्तर प्रदेशातले मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी संधान बांधले. एससी, एसटी या आरक्षित जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. सोबतच ज्या जागांवर आपली ताकद नाही, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आज निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघांची  घोषणा केली आहे.

    मनोज जरांगे हे मराठवाड्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठवाड्यातील मतदारसंघ निवडले आहेत. यामध्ये बीड, परतूर, फुलंब्री, पाथरी यासारख्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

    मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार? 

    1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)

    2) परतूर, (जालना जिल्हा)

    3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)

    4) बीड, (बीड जिल्हा)

    5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)

    6) पाथरी,( परभणी जिल्हा)

    7) हदगाव, (जिल्हा नांदेड)

    कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?

    1) भोकरदन, (जालना जिल्हा)

    2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)

    3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)

    4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)

    5) जिंतूर, (परभणी जिल्हा)

    6) औसा-(लातूर जिल्हा)

    कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?

    1) बदनापूर राखीव जालना जिल्हा

    2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

    जरांगे यांनी जाहीर केलेल्या मतदारसंघाची संख्या 15 आहे. मराठवाड्यात एकूण 48 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 15 जागांवर जरांगे यांचे उमेदवार लढतील किंवा समोरचे उमेदवार पाडतील.

    Manoj jarange to shake the entire Maharashtra; Our “chosen” Marathwada is better in fighting and demolishing!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhand Bharat : नागपूरच्या झिरो माईल येथे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’सह अनेक प्रकल्पांना मंजुरी

    Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!