• Download App
    Manoj Jarange to Protest in Mumbai on August 29 मनोज जरांगे म्हणाले- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार;

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार; फडणवीसांवर समाजाचा राग

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : Manoj Jarange मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. पूर्वतयारीसाठी बुधवारी सोलापुरात आले होते. दिवसभर मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी, ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाचा राग असून भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला नको.’Manoj Jarange

    घरात असलेल्या वाहनाने बांधवांनी मुंबईत यायचे. ते म्हणाले, ‘२९ ऑगस्ट रोजी मुंबईत दुसरा जनसागर बघायला मिळेल. त्यासाठी २७ ऑगस्ट रोजी आंतरवालीतून मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील. त्यापूर्वीच सरकारने चर्चा करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. त्यानंतर वाटेत चर्चा नाही. मोर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याचा काही सबंध नाही. मराठा समाजाच्या आजी-माजी नेत्यांनी मुंबईत यावे. सरकारने पोलिसांच्या बळावर आंदोलन मोडू नये. आम्ही शांततेने आंदोलन करतोय. २७ ऑगस्टला आंतरवालीतून मोर्चा निघेल. पैठण, शेगाव, अहिल्यानगरमार्गे शिवनेरी गडावर मुक्काम असेल. माळशेज घाटात अडचण येऊ शकते. त्यामुळे राजगुरूनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानात मोर्चा पोहोचेल.Manoj Jarange



    घरात असेल त्या वाहनाने मुंबईत पोहोचा…

    मोर्चासाठी ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. घरात असेल त्या दुचाकी, चारचाकी, कंटेनर, ट्रॅक्टर आदी वाहनांनी मराठा बांधव मुंबईत येतील. यात प्रामुख्याने डाॅक्टर रुग्णवाहिकेसह येतील. आजी व माजी सर्वपक्षीय नेते असतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि आंदोलनाचा काही सबंध नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

    दीड वर्ष वेळ दिला, आता फसवणूक होणार नसल्याची आशा

    मागील वेळी मुंबईत आमची फसवणूक झाली. सरकारला दीड वर्षे वेळ दिला, त्यामुळे यावेळी फसवणूक होणार नसल्याची आशा आहे. निर्णय घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. शांततेने आंदोलन करू. जो कोणी शांतता बिघडवेल, तो आमचा नाही. त्यांची पाठराखण करणार नाही. सरकारने लोक घुसवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इंचही मागे हटणार नाही, असेही जरांगे यांनी या वेळी सांगितले.

    Manoj Jarange to Protest in Mumbai on August 29

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !