विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj jarange बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजी राजे यांनी स्वतःला तिसरी आघाडी हे नाव घ्यायचे नाकारून परिवर्तन महाशक्ती हे नाव घेतले. परंतु, त्यांच्या राजकीय हालचाली पाहता प्रत्यक्षात त्यांची कुठली पर्यायी शक्ती निर्माण होण्यापेक्षा मनोज जरांगे हेच सगळ्यांना “पर्यायी शक्ती” ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.Manoj jarange
महायुती आणि महाविकास आघाडीतल्या नाराजांवर डोळा ठेवून तिथून उमेदवारी नाकारलेल्यांना परिवर्तन महाशक्ती उमेदवारी देणार आहे. हे बच्चू कडू यांनी स्वतःच जाहीर करून 100 ची उमेदवार यादी लवकरच आणणार असल्याचे सांगितले. याचा अर्थ परिवर्तन महाशक्तीकडे स्वतःचे असे कोणते उमेदवारच नाहीत हे बच्चू कडूंच्या तोंडून अप्रत्यक्षपणे बाहेर आले.
परिवर्तन महाशक्तीची ही ताकद लक्षात घेऊन महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे नेते त्यांची कुठली दखलच घेत नसल्याचे उघडपणे दिसू लागले.
त्या उलट मराठवाड्यातले सर्वपक्षीय इच्छुक मनोज जरांगे यांचा उंबरठा झिजवत आहेत. सर्वपक्षीय बडे नेते तर त्यांना भेटून गेलेच, पण आता वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आणि इच्छुकही मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या मागे लागले आहेत. किंवा त्यांनी त्यांचे उपद्रव मूल्य तरी दाखवू नये अशी मनधरणी करू लागले आहेत.
मनोज जरांगे यांनी 120 मतदारसंघांमध्ये मराठा शक्तीने लढायची घोषणा केली आहे. त्यातच ते मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन करण्याच्या तयारीला देखील लागले आहेत. म्हणूनच मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय उमेदवारांना मनोज जरांगे यांचा “राजकीय धोका” उत्पन्न झाला आहे. परिवर्तन महाशक्तीचा असा कुठलाच धोका किंवा राजकीय उपद्रव मूल्य कुठल्याच पक्षांना वाटत नाही. त्यामुळे परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांकडे कुठले पक्षांचे उमेदवार किंवा इच्छुक बडे नेते गेल्याचे कधी दिसले नाही. किंवा कुठल्याही पक्षांच्या बड्या नेत्यांनी तर त्यांची दखलही घेतलेली नाही.
त्यामुळेच बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांनी जरी तिसरी आघाडी हे नाव नाकारून परिवर्तन महाशक्ती नाव घेतले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा राजकीय उपद्रव मूल्ल्याच्या बळावर मनोज जरांगे हेच सगळ्यांना पर्यायी शक्ती म्हणून उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
Manoj jarange more powerful than third front in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Samajwadi Party काँग्रेस आणि ‘सपा’मधील संबंधात दुरावा; काँग्रेस उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक लढवणार नाही
- Narendra Modi लोकांच्या अन् देशाच्या विकासासाठी जनतेचा पैसा खर्च करणे हे आमचे प्राधान्य – मोदी
- Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, डॉक्टरांसह ६ जण ठार
- Jawan Amar Pawar : छत्तीसगड येथील नक्षलवादी चकमकीत साताऱ्यातील जवान अमर पवार शहीद