विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.Manoj Jarange
अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या 3 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ‘नांगर’ टाकण्याची घोषणा केली आहे.Manoj Jarange
नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही तात्पुरता आनंद आहे, जसा देवेंद्र फडणवीस प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात,” अशा शब्दांत त्यांनी मदतीच्या पॅकेजवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, भाऊबीजेच्या दिवशी नुकसानीच्या याद्या तयार करत आहोत आणि लवकरच बैठक घेऊन राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेते यांना एकत्र बोलावून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.
न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही
सत्ताधारी आमदारांना विकास निधी म्हणून हजारो कोटींची खिरापत वाटली जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. “आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत, तरी त्यांना ५ कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला आणि लाडक्या दाजीला न्याय दिल्याशिवाय शांत बसायचे नाही,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी हमीभाव, कर्जमुक्ती, कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करण्यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन उभे करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
भुजबळ संधी साधू, धनंजय मुंडेंवरही टीका
मनोज जरांगे यांनी या दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “हा संधी साधू आहे. त्या विचारात वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडे, त्रास देणारा कसा होऊ शकतो वारस चालवणारा? त्यांचे हात रक्ताने भरलेले आहेत. त्यांनी हयातीत गोपीनाथ मुंडे यांना खूप त्रास दिला आहे. जो खरा वारस आहे तो हे विसरतो तरी कसा काय? असा सवाल जरांगे यांनी केला. जातीचा म्हणून किंवा तुमच्या घरातलं घर आहे म्हणून विसरताय त्रास दिलेला इतका, ही कुठली परंपरा आहे, असेही जरांगे म्हणाले.
ओबीसी आरक्षणावरून सरकारला इशारा
आरक्षण आणि जीआरच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी फडणवीस आणि सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. “ओबीसींना म्हणायचे तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा, पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही, तर तुमचा सुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या,” असा स्पष्ट इशारा देत, मराठा आरक्षणाच्या जीआरला धक्का लागल्यास आंदोलन कोणत्याही दिशेला जाऊ शकते, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
Manoj Jarange Announces Farmers Agitation After Maratha Reservation Justice For Crop Loss
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती करणारी देशातील प्रमुख संस्था, बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही- बावनकुळे
- Thackeray : साडेतीन महिन्यांत 10 भेटी, ‘युती’च्या चर्चांना उधाण! दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र
- Mamdani Photo : ममदानींनी इमामसोबत फोटो काढल्याने ट्रम्प संतापले; म्हणाले- अनर्थ होतोय, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणाऱ्या व्यक्तीशी मैत्री निभावताय
- तेजस्वी यादव आणि मुकेश सहानींना काँग्रेसने लावली लॉटरी; पण बिहारी महागठबंधन मध्ये जागा वाटपाचा घोळ कायम!!