• Download App
    मल्हारराव की यशवंतराव होळकर??; गोपीचंद पडळकरांनी पकडली "चाणाक्षां"ची चूक!!, नंतर नवे ट्विट Malharrao or Yashwantrao Holkar Gopichand Padalkar caught the mistake of Chanaksha

    मल्हारराव की यशवंतराव होळकर??; गोपीचंद पडळकरांनी पकडली “चाणाक्षां”ची चूक!!, नंतर नवे ट्विट

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सातत्याने टार्गेट करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज चपखलपणे “चाणाक्षां”ची चूक पकडली… पडळकरांनी ही चूक दाखवताच पवारांनी ती सुधारलेली दिसली!! Malharrao or Yashwantrao Holkar Gopichand Padalkar caught the mistake of Chanaksha

    श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवारांनी त्यांना अभिवादन केले. पण या ट्विटमध्ये पवारांनी मल्हारराव होळकर यांच्या ऐवजी यशवंतराव होळकर यांचा फोटो शेअर केला होता. गोपीचंद पडळकर यांच्या हे लक्षात येताच त्यांनी पवारांवर शरसंधान साधणारे ट्विट केले. पडळकरांनी चूक दाखवून दिल्यानंतर, पवारांनी ते ट्विट काही वेळातच डिलीट केले.

    – पडळकरांचे ट्विट

    ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये. तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार, असे ट्विट करत पडळकर यांनी पवारांवर शरसंधान साधले. पण त्यानंतर पवार यांनी आपले आधीचे ट्विट डिलीट करून नवीन ट्विटमध्ये मल्हारराव होळकर यांचा फोटो वापरला.

    Malharrao or Yashwantrao Holkar Gopichand Padalkar caught the mistake of Chanaksha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल