विशेष प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने संवेदनशील असलेला माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या वतीने माहिम समुद्र किनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण आता खुले झाले आहे.Mahim Beach Beautification Project complited : Mahim seaside Transformation, new radiance
जी/उत्तर विभागातील माहिम रेतीबंदरचा परिसर पूर्वी बहुतांशी अवजड वाहनांच्या अनधिकृत वाहनतळाने व्यापलेला होता. सोबत, किनाऱ्याच्या उत्तरेकडील भाग तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामे, झोपड्या यामुळे बाधित होता. दक्षिणेस माहिम पोलिस वसाहतीची भिंत मोडकळीस आलेली होती.
समुद्र किनाऱ्यालगत कचऱ्याचे ढीग जमा होत होते. त्यातच समुद्र किनाऱ्यावर लहानमोठ्या स्वरुपाचे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले होते. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने सातत्याने उपाययोजना आणि कार्यवाही करुनही या समस्या वारंवार उद्भवत होत्या.
- महिमा समुद्र किनारपट्टीचा केला कायापालट
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
- सुशोभिकरणामुळे पर्यटकांचे नवे आकर्षण ठरणार
- समुद्र किनारपट्टी कशी असावी, याचे ठरले उदाहरण
- समुद्र किनारी फिरण्याचा आनंद घेता येणार
- समुद्र उंचावरून पाहण्यासाठी मनोरा
- परिसर चकाचक केल्याने सौदर्य वाढले
- समुद्र किनारी व्यायाम करण्याची सूविधा